Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Practical Mind Programming

प्रत्येक कृतीची सुरवात विचारांनी होते. जर आपण चांगले विचार केले तर चांगली कृती होते आणि वाईट विचार दुष्कृत्याला जन्म देतात. आपण ज्या गोष्टी बघतो, अनुभवतो त्यांचा पगडा आपल्यावर असतो. आपले subconscious आणि conscious mind यात महत्वाची भूमिका बजावते. आपले Subconscious कॉम्पुटर च्या प्रोग्रामिंग सारखे काम करते Practical Mind Programming मध्ये या Subconscious mind चे प्रोग्रामिंग होते. मानवी मनाच्या अफाट कल्पनाशक्तीचा (imagination) वापर करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी ही थेरपी अतिशय उपयुक्त ठरते. आपण जसा विचार करतो तसे आपण बनत जातो या उक्ती नुसार subconscious mind ला सूचना देऊन mind programming केले जाते. यात खालील पद्धतीचा वापर होतो.

' तुम्हाला काय हवे आहे हे नक्की ठरवा तुमच्या ध्येयाच्या मध्ये काय अडथळे येतात ते शोधा '

' नकारात्मक विचारांना दूर सारुन सकारात्मक विचार करा आणि त्यांना कृतीची जोड द्या '

Mindfulness based Cognitive Therapy

ही थेरपी डिप्रेशन शी संबंधित आजार बरे करण्यासाठी वापरतात . यात psychotherapy आणि mindfulness आणि mindfulness mediation चा वापर होतो . पेशंटला त्याच्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल जागरूक केले जाते. येणारे विचार न थांबवता आणि त्यावर react न होता depression प्रोसेस थांबवण्याचे काम ही थेरपी करते.

Supportive Psychotherapy

या थेरपी मध्ये psychotherapy ,cognitive behaviour आणि interpersonal relation यांचा योग्य समन्वय साधला जातो . पेशंट आणि डॉक्टर यातील विश्वासाला यात खूप महत्व असते. addiction असणारे पेशंट बरे करण्यासाठी ही थेरपी मोठ्या प्रमाणावर वापरतात .

Solution focused brief Therapy

या थेरपी मध्ये problem पेक्षा solution (उपाय ) याला जास्त महत्व दिले जाते. जीवनात सर्व समस्या एकाच वेळी येत नाहीत . चढ उतार आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. जेव्हा कमी संकटे असतात तेव्हा आपण अनेक positive गोष्टी करतो . या सकारात्मक गोष्टींवर भर देऊन आत्मविश्वास वाढवण्याचे काम ही थेरपी करते.

Emotional Freedom Technique

या थेरपी मध्ये कौन्सेल्लिंग बरोबर Alternate Medicine चा वापर केला जातो. या थेरपी ला Psychological acupressure. असेही म्हणतात .