Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Family Therapy

आपल्या जीवनात नाते संबंधाना खूप महत्व आहे. पण कधी कधी ह्या नात्यात तणाव निर्माण होतात. हे तणाव दूर करून नाती जोडण्याचे काम Family Therapy करते. हि सायकोथेरपी ची एक शाखा असून कौटुंबिक आणि पती पत्नी संबध मजबूत करण्यास मदत करते. कौटुंबिक संबंधाना यात खूप महत्व दिले जाते. कौन्सेलिंग च्या माध्यमाने या थेरपी चा वापर केला जातो.

आजकालच्या जगात आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळच नसतो. या अबोल्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात. या थेरपी मध्ये तुम्हाला बोलायला एक Platform दिला जातो. Family एक Emotional Unit आहे आणि यात वेगळे communication Pattern असे असतात असे Systematic Thinking याचा पाया आहे.

या थेरपी नुसार जर कुटुंबातील एक सदस्य आजारी असेल तर, ते पूर्ण कुटुंबाच्या समस्येचे लक्षण आहे. ज्यात आपण त्या आजारी सदस्यावरच उपचार केले तर आपण आजाराच्या लक्षणावर उपचार करतो पण, समस्येचे मूळ कारण मात्र दुर्लक्षित राहते. आणि त्या समस्येची लागण इतराना पण होते व हे सायकल चालूच राहते.

Family Therapy चा उपयोग :

  • मुले आणि पालकांचे संबध
  • पती पत्नी संबध
  • एखाद्या सदस्याच्या मानसिक समस्येमुळे घरातील वातावरणात बिघाड
  • दारू किंवा व्यसनची समस्या
  • ताणताणाव, भीती दूर करण्यास मदत
  • लग्नापूर्वीचे Counseling
  • घटस्फोट, पुनर्विवाहातील समस्या