Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

1. हिप्नोथेरपी म्हणजे काय ?

सकारात्मक सूचनांचा प्रभावी वापर करून आपला विचार भावना आणि वागण्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारी हिप्नोथेरपी ही प्रभावी उपचारपद्धत आहे. यात मेंदूच्या Subconscious भागावर लक्ष केंदित करून त्याला जागृत करतात आणि तुम्हाला trance मध्ये नेले जाते. Subconscious अवस्थेत विचारात अपेक्षित बदल होतात व मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

2. हिप्नोथेरापिस्त आणि हिप्नोटिस्त यात फरक का ?

हिप्नोथेरपी ही विविध मानसिक आजार बरे करणारी थेरपी असून तिचा वापर तज्ञ मानसोपचार तज्ञ ज्यांनी हिप्नोथेरपीचे शास्तोधन प्रशिक्षण घेतले आहे असी व्यक्तीच करू शकते. हिप्नोथेरापिस्त म्हणजे अशी तज्ञ व्यक्ती. पण हिप्नोटिस्त अशा आजारांवर उपचार करू शकत नाहीत. ते हिप्नोसीस चा उपयोग stage show किंवा करमणूकीसाठीच करू शकतात.

3. हिप्नोथेरपीने कोणते आजार बरे होतात ? शारीरिक की मानसिक ?

हिप्नोथेरपीत ताणतणाव, नैराश्य, फोबिया, OCD यासारखे अनेक मानसिक आजार बरे होतात. तसेच अनेक शारीरिक व्याधीचे मूळ मानसिकतेत असते. उदा. तुम्हांला High BP चा त्रास आहे, दिसायला हा शारीरिक आजार पण Tension हे त्याचे मुळ कारण, मग Tension या मानसिक आजारांवर उपचार केले तर BP चा त्रास कमी होईल.

4. साधारणपणे उपचारांचा कालावधी किती असतो ?

उपचारांचा कालावधी तुमच्या आजारावर आणि आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. डॉक्टरांशी consult केल्यावर कालावधी ठरवला जातो.

5. उपचारांदरम्यान औषधे दिली जातात का ?

हिप्नोथेरपी ही पूर्णपणे Drugless थेरपी आहे. यात कुठलीही औषधे दिली जात नाही.

6. उपचारांची फी किती असते ?

पहिल्यांदा consultation ची फी ५००रु असे त्यानंतर तुमचा आजाराचा प्रकार त्याची तीव्रता आणि उपचारांचा कालावधी त्यावर फी ठरवली जाते.

7. हिप्नोथेरपीचा वापर करून एकाद्याच्या मनाविरुद्ध समाजविधायक काम करून घेता येते का ?

हिप्नोथेरपीचा वापर असा समाजविधायक कामासाठी करून घेता येत नाही.

8. माझी सध्या हिप्नोथेरपीचा वापर असलेली ओषधे हिप्नोथेरपी केल्यावर पूर्णपणे बंद होऊ शकतात का ?

प्रशिक्षित हिप्नोथेरपीस्ट कडून उपचार घेतल्यावर तुमच्या तब्येतीत सुघारणा घडून येते त्यानुसार तुम्ही तुमच्या डॉ .रांचा सल्याने औषधाचा डोस कमी करू शकता आणि मग तो पूर्णपणे बंद ही करता येतो.

9. हिप्नोथेरपी किती प्रभावी असते ? केलेले उपचार कायमस्वरूपी असतात का ?

विविध मनोशारीरिक आजारांवर उपचार करणारी हिप्नोथेरपी ही प्रभावी उपचार प्रणाली आहे जर तुम्ही तज्ञ , अनुभवी , अभ्यासू हिप्नोथेरपीस्ट कडून उपचार करून घेतले आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे व सल्ल्याचे तंतोतंत पालन केले तर उपचारांचा प्रभाव कायम स्वरूपी टिकतो.

10. हिप्नोथेरपी द्वारे उपचार घेण्यासाठी वयाची अट असते का ?

शक्यतो दहा वर्षावरील व्यक्ती जी संमोहनाच्या सूचनेला योग्य प्रतिसाद देऊ शकेल अशा व्यक्तीवर हिप्नोथेरपीचा प्रभावी परिणाम होतो.